
गडचिरोली : स्थानिक गोंडवाना सैनिकी विद्यालायत डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून विद्यालायाचे प्राचार्य संजीव गोसावी हे होते. तर प्रमुख अतिथि म्हणून उपप्राचार्य ओमप्रकाश संग्रामे, पर्यवेक्षक अजय वानखेड़े हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते डॉ. ए.पी.जे अब्दुल यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुण दीप प्रज्वलित करण्यात आले. प्रसंगी प्राचार्य संजीव गोसावी यांनी संपूर्ण देशाला आजही भारताच्या ‘मिसाईल मॅन’ची आठवण येत आहे. डॉ. कलाम यांनी देशाच्या कल्याणासाठी दिलेले योगदान कधीही विसरता येणार नाही. एक शिक्षक, शास्त्रज्ञ आणि राष्ट्रपती म्हणून एपीजे अब्दुल कलाम होते डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे विचार आजही लाखो तरुणांसाठी प्रेरणास्रोत आहेत असे बोलून कलाम यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
कलाम यांच्या महान योगदानामुळे आपला देश आण्विक राष्ट्रांच्या गटात आला आहे. ते एक प्रसिद्ध वैज्ञानिक आणि अभियंता होते ज्यांनी २००२ ते २००७ पर्यंत ११ वे राष्ट्रपती म्हणून देशाची सेवा केली. त्यांनी १९९८ च्या पोखरण-२ अणुचाचणीमध्येही भाग घेतला. ते देशाच्या विकासासाठी नेहमीच ध्येय ठेवणारे दूरदृष्टी आणि विचारांचे माणूस होते. अशा शब्दात उपप्राचार्य ओमप्रकाश संग्रामे यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.



