क्राईमचंद्रपूरमुख्य बातमीविदर्भ

३५ लाखांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू जप्त

व्याहार्ड (खुर्द) येथे आंतरजिल्हा बॉर्डरवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

चंद्रपूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन व पोलिस विभाग ऍक्शन मोडवर आले. याचाच भाग म्हणून स्थानिक गुन्हे शाखेने व्याहार्ड (खुर्द) येथे आंतरजिल्हा बॉर्डरवर लावलेल्या एसएसटी चेक पोस्टवर शुक्रवारी (दि. १८) १९ लाख १५ हजार ८०० रुपयांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व वाहनाची किंमत १७ लाख रुपये असा एकूण ३४ लाख ९३ हजार ९०० रुपयांचा माल पंचनामा करून जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, आंतरराज्य सीमेवर पोलिसांची कुमक वाढविण्यात आली आहे.

सावली ठाणे परिसरात स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरचे अधिकारी व अंमलदार पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान, सीजी ०७ सीक्यु ४६०२ क्रमांकाच्या कारमधून प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व पानमसाल्याची अवैध वाहतूक असल्याची माहिती पथकाला मिळाली. एसएसटी चेक पोस्ट व्याहाड (बुज) येथे नाकाबंदी करून तपासणी केली. यावेळी वाहनातून लोखंडी तारेच्या बंडल खाली लपवून ठेवलेला महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला मजा १०८ सुंगधित हुक्का, शिशा तंबाखूचे २०० ग्रॅम वजनाचे १६८० बॉक्स, ५० ग्रॅम वजनाचे १८०० बॉक्स एकूण किंमत १९ लाख १५ हजार ८०० रुपये व वाहनाची किंमत १७ लाख रुपये असे एकूण ३४ लाख ९३ हजार ९०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. इरफान कुरेशी मुस्तफा कुरेशी (२७, छत्तीसगड), संतोष कुमार सुंदर सिंह (४७, मध्य प्रदेश) अशी आरोपींची नावे आहेत.

ही कारवाई पोलिस निरीक्षक महेश कोंडावार, सहायक पोलिस निरीक्षक दीपक कांकेडवार, संतोप निंभोरकर, चेतन गज्ञ्जलवार, नितेश महात्मे, किशोर वाकाटे, अमोल सावे, प्रफुल गारघाटे, प्रमोद डबारे आदींनी केली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक दीपक कांकेडवार करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button