गडचिरोलीविदर्भ

निवडणुकीसाठी जिल्ह्यात 4855 मतदान अधिकाऱ्यांची निवड, सरमिसळ प्रक्रिया पूर्ण

27 महिला तर 61 दिव्यांगांचा समावेश

गडचिरोली : विधानसभा निवडणुकीकरिता मतदान अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्रथम सरमिसळीकरणाची (रॅण्डमायझेशन) प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने, नोडल अधिकारी शेखर शेलार, जिल्हा विज्ञान व सूचना अधिकारी संजय त्रिपाठी तसेच राजकीय पक्षाचे प्रतिनिधी  यावेळी उपस्थित होते.

मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी क्रमांक १ व इतर मतदान अधिकारी यांची सरमिसळ प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राष्ट्रीय सूचना केंद्रात संगणक प्रणालीद्वारे पूर्ण करण्यात आली. यात जिल्ह्यातील आरमोरी, गडचिरोली व अहेरी या तीन विधानसभा मतदारसंघाकरिता एकूण ४८५५ मतदान अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यात आरमोरी क्षेत्राकरिता १५४६ अधिकारी, गडचिरोली क्षेत्राकरिता १८२१ तर अहेरी विधानसभा क्षेत्राकरिता १४८८ मतदान अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. यात २७ महिला अधिकारी तर ६१ दिव्यांग मतदान अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button