
गडचिरोली : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे समान किमान कार्यक्रमानुसार ऑक्टोबर-२०२४ मध्ये ” सायबर सुरक्षा सप्ताह” या विषयावर कार्यक्रम घेणेबाबत निर्देश दिलेले होते. त्याअनुषंगाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली तर्फे २१ ऑक्टोबर रोजी दुपारी ०२.०० वाजता ‘विधी सेवा सदन’, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली येथे कायदेविषयक जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले.
कायदेविषयक जनजागृती शिबीरास अध्यक्ष म्हणून प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा न्यायाधीश-१ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. आर. सित्रे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव आर. आर. पाटील, त्याचप्रमाणे सायबर सेलच्या महिला पोलीस उप-निरीक्षक नेहा हांडे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पी. आर. सित्रे यांनी केले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून सायबर सेलच्या महिला पोलीस उप-निरीक्षक नेहा हांडे यांनी सायबर सुरक्षा बाबत उपस्थितांना सखोल माहिती दिली. आर. आर. पाटील यांनी उपस्थितांना सायबर सुरक्षा बाबत माहिती दिली.
कायदेविषयक शिक्षण शिबिराचे संचालन कनिष्ठ लिपीक जे. एम. भोयर, यांनी केले तर आभार कनिष्ठ लिपीक एम. डी. गुरनूले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सर्व कर्मचारी व जिल्हा न्यायालयाचे कर्मचारी यांनी सहकार्य केले.



