गडचिरोली विधानसभेची उमेदवारी आ. डॉ. देवराव होळी यांनाच द्यावी

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषदेतून मागणी
गडचिरोली : गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून २०१४ व २०१९ ला झालेल्या निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने विजय मिळवणारे भाजपाचे आ. डॉ. देवराव होळी यांनाच २०२४ ला होऊ घातलेल्या विधानसभेत गडचिरोली मधून महायुतीने उमेदवारी द्यावी, अशी मागणी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व आमदार होळी मित्रपरिवारातील नेत्यांनी गडचिरोली ऑल मीडिया असोसिएशनच्या वतीने आयोजित हॉटेल वैभव येथे पार पडलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेतून केली आहे.
२५ ऑक्टोबरला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आमदार डॉ. देवराव होळी मित्रपरिवार व समर्थकांचा, कार्यकर्त्यांचा मेळावा अभिनव लॉन येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती सुद्धा या पत्रकार परिषदेतून देण्यात आली.
आमदार डॉ. देवराव होळी यांनी गडचिरोली जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय त्याप्रमाणेच कोटगल बॅरेज सिंचन योजना यासारखे अनेक विकासकामे केलीत अशी विकासदृष्टी असणाऱ्या आमदार डॉ. देवराव होळी यांनाच भाजपाने येत्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत गडचिरोली येथून उमेदवार म्हणून घोषणा करावी अशी मागणी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आली.
पत्रकार परिषदेला हेमंत जम्बेवार अध्यक्ष शिवसेना (शिंदे गट) राकेश बेलसरे, मुक्तेश्वर काटवे भाजपा शहराध्यक्ष, विलास दशमुखे माजी सभापती, विलास निखारे सरपंच, नीता वडेट्टीवार, योगिता पिपरे, लौकिक भिवापुरे यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.



