
अन्य पक्षातील कार्यकर्त्यांनीही हाताला बांधली घडी
मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी दुप्पटे टाकून केले स्वागत
अहेरी : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख व विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) कार्यकारी जिल्हाध्यक्ष रियाज शेख यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे अहेरी तालुका प्रमुख (ग्रामीण) सुनील वासनिक तसेच सिरोंचा शिवसेना तालुका प्रमुख रघु जाडी यांच्या सह असंख्य शिवसैनिकांनी आणि अन्य विविध पक्षातील बहुसंख्य कार्यकर्त्यांनी मंगळवार, 22 ऑक्टोबर रोजी येथील वासवी हॉल मध्ये आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षात प्रवेश केला.
धर्मराव बाबा आप आगे बडो, हम तुम्हारे साथ है…क्यो पडे हो चक्कर मे, कोई नहीं है टक्कर मे अशा जय घोषणांनी असंख्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजित पवार गट) प्रवेश झाला. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी घडी चिन्हांचे दूप्पटे टाकून स्वागत केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
पक्ष प्रवेश करणाऱ्यांमध्ये शिवसेनेचे (उबाठा गटाचे) अहेरी तालुका ग्रामीण तालुकाप्रमुख सुनील वासनिक, नागेपल्लीचे माजी सरपंच विजय आत्राम, रगु कोलापल्ली, मुजफर शेख, देविलाल मिंज आदी व असंख्यानी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला.
सिरोंचा तालुका शिवसेना उध्दव बाळासाहेब गटाचे शिवसेना तालुका प्रमुख रघुनंदन जाडी, प्रवीण भगत, अशोक बेडके, विष्णू जाडी, हरीश अरेला विभाग प्रमुख, गोपी सोदारी उपविभाग प्रमुख, बापू अरेला शाखा प्रमुख, गोवर्धन कुलरी शाखा प्रमुख, राजेश गानला शाखा प्रमुख, पवन जनगाम, व्यंकटी वावरे, प्रशांत जनगाम, किरण कुल्लरी, रमेश बेडके, रवी ताटी, राजेश रामटेके, राजेश जाडी, चंदू भगत, तिरुपती गोदांरी माजी उपसरपंच ग्राम पंचायत नारायणपूर, आदी पदाधिकारी व अन्य असंख्य शिवसैनिकांनी प्रवेश केला.
कमलापुर, ताटीगुडम येथील संतोष बोम्मनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सिताराम गावडे, रमेश सिडाम, राकेश आलाम, कैलास कोडापे, विजय आत्राम, संतोष सडमेक, अशोक कोडापे, दिलीप सडमेक, आकाश सिडाम, विलास कोडापे, प्रतीक कोडापे, रुपेश सडमेक, मुकेश सडमेक, चंद्रशेखर सडमेक, मनोज सिडाम, विक्रम आलाम, वासुदेव कोडापे, अविनाश मडावी, चंद्रकांत मडावी, नागेश सिडाम, मधुकर वेलादी, प्रदीप गावडे, प्रमोद मडावी, मनोज चौधरी, गणेश इस्मुल, चिरंजीव येजुलवार, राजकुमार येजुलवार, जीवन भंडावार आदी व असंख्याणी राष्ट्रवादी (अजित पवार गटात) प्रवेश केले .
छल्लेवाडा येथील काँग्रेस व आविसचे प्रसाद दुर्गे, शंकर रामटेके, चिन्ना झाडे, राजम गोदारी, सुनील दुर्गे, बापू गावडे, अंकुबाई रामटेके, व्यंकटीबाई दुर्गे यांच्यासह असंख्य महिला भगिनींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केले. त्यांचे सिनेट सदस्या तनुश्री आत्राम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दुपट्टा टाकून स्वागत केले.
उमानुर येथील भगवान गावडे, रणजित सिडाम, सदनंद गावडे, वासुदेव गावडे, संतोष गावडे, समया कोडापे, दुर्गेश गांपा, लक्ष्मी मडावी, सिनु लीलेडी, साई गावडे, श्रीकांत सिडाम, राजेश सिडाम, चिरंजीव सडमेक, सचिन आत्राम, हणमंत आलाम आदींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गटात) प्रवेश केले.
विधानसभेची निवडणूक काही दिवसांत असताना विविध पक्षाचे असंख्य कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) प्रदेश उपाध्यक्ष तथा मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या पक्षात प्रवेश घेत असल्याने विधानसभा 2024 निवडणूक ‘रेकॉर्ड ब्रेक’ मतांनी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष धर्मरावबाबा आत्राम हे जिंकण्याचे एकंदरीत चित्र अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रात निर्माण झाले आहे.



