क्राईमचंद्रपूरविदर्भ

१९ लाखांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू जप्त

आंतरजिल्हा सीमेवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 

चंद्रपूर : आंतरजिल्हा सीमेवरून प्रतिबंधित सुगंधित तंबाखू वाहतूक करताना चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखा पथकाने मंगळवारी (दि. २९) १९ लाख ९३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने दारूबंदी, जुगार प्रतिबंध, प्रतिबंधित सुगंधित तंबाखू तसेच इतर अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिस प्रशासन अलर्ट झाले. सावली परिसरात स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरचे अधिकारी व अंमलदार पेट्रोलिंग करीत होते. सी.जी. ७-सी क्यू ४६०२ क्रमांकाच्या ट्रकमधून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला सुगंधित तंबाखू व पानमसाला विक्रीसाठी गडचिरोली ते चंद्रपूर मार्गावरून अवैधरित्या वाहतूक करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दरम्यान मजा १०८ सुगंधित हुक्का शिशा तंबाखूचे २०० ग्रॅम वजनाचे १६८० बॉक्स, ५० ग्रॅम वजनाचे १८०० बॉक्स एकूण किंमत १९ लाख ९३ हजार ८०० आणि जप्त ट्रक १५ लाख असा एकूण ३४ ला ९४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी वाहन चालकाविरुद्ध सावली ठाण्यात भारतीय दंड विधान कलम ३० (२), (अ), २६ (२), (१) २६(२) (३), ५९ अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६, सहकलम २२३, २७५, १२३ भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

एस.एस.टी. चेक पोस्ट व्याहाड (बु) उपविभागीय पोलिस अधिकारी शिवलाल भगत, चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार, सहायक पोलिस निरीक्षक दीपक कांक्रेडवार, पोलिस उपनिरीक्षक संतोश निंभोरकर, चेतन गज्जलवार, नितेश महात्मे, किशोर वैरागडे, अमोल सावे, प्रफुल्ल गारघाटे आदींनी ही कारवाई केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button