गडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

शिंदे व भाजपा लुटारू सरकार – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

बंडखोरी करणाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी नक्कीच, अनेक उमेदवार माघार घेणार

गडचिरोली : शहरातील चामोर्शी रोड येथील सेलिब्रेशन फंक्शन हॉलमध्ये आज झालेल्या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी  महायुतीवर जोरदार प्रहार करत चांगलाच समाचार घेतला.

विजय वडेट्टीवार म्हणाले, राज्यात महायुती सरकारने बेरोजगारांना, शेतकऱ्यांना चांगलेच वाऱ्यावर सोडलेले आहे, अशा या आरक्षण विरोधी सरकारला या निवडणुकीत चांगलाच जनता धडा शिकवणार आहे. शिंदे व भाजपा सरकार लुटारू सरकार आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात सुद्धा कमिशन खाणारी सरकार, दोन लाख बेरोजगारांना स्थगिती दिलेल्या महायुती सरकारला शेवटी स्थगिती उठवून २ लाख बेरोजगारांना महाविकास आघाडीने नोकरी देण्याचे काम यावेळेस करावे लागले आहे. गृहमंत्री फडणवीस असलेल्या जिल्ह्यात सहा महिन्यात ३५३ महिलावर अत्याचार झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत.

येत्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीचे किमान १७५ ते १८० उमेदवार निवडून येऊन सरकार महाविकास आघाडीचीच बनेल तथा विदर्भामध्ये ४५ पेक्षा अधिक उमेदवार निवडून येतील असा विश्वास विजय वडेट्टीवार यांनी बोलून दाखविला.

पत्रकार परिषदेला गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान, गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे उमेदवार मनोहर पोरेटी, माजी जिप सदस्य राम मेश्राम, माजी जिप अध्यक्ष बंडोपंत मल्लेलवार, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष कविता मोहरकर, शहराध्यक्ष सतीश विधाते, रजनीकांत मोटघरे, हसनअली गिलानी, प्रभाकर वासेकर, राजेश कात्रटवार, समशेर खां पठाण, मलिक बुधवानी, प्रशांत थोरात, यांचेसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button