गोंदियाविदर्भ

प्रकृती बिघडल्याने कर्तव्यावर असलेल्या जवानाचा मृत्यू

सिलिगुडी येथे सैन्य दलात होते कार्यरत

गोंदिया : पश्चिम बंगाल राज्यातील बागडोगरा सिलिगुडी येथे सैन्य दलात कार्यरत असलेल्या तालुक्यातील मुंडीपार येथील जवानाचा प्रकृती बिघडल्याने आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि.१) घडली. गीतेश देवराम चौधरी (४१) असे मृतक जवानाचे नाव आहे. गीतेश चौधरी पुढील वर्षी डिसेंबर महिन्यात सेवानिवृत्त होणार होते. पण त्यापूर्वीच त्यांची प्रकृती खालावल्याने मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने तिरोडा तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील मुंडीपार/बेलाटी येथील गीतेश देवराम चौधरी (४१) हे आर्मी सप्लाय फोर्समध्ये २००१ मध्ये दाखल झाले होते. पुढील वर्षी डिसेंबर महिन्यात ते सेवानिवृत्त होणार होते. सध्या ते पश्चिम बंगाल राज्यातील बागडोगरा सिलिगुडी येथे कर्तव्यावर होते. कर्तव्यावर असतानाच शुक्रवारी अचानक त्यांची प्रकृती बिघडली. अन् काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. गीतेशच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी, आई-वडील व बराच मोठा चौधरी परिवार आहे.

गीतेश यांचे पार्थिव सोमवारी (दि.४) मुंडीपार येथे आणण्यात येणार असून सकाळी १० वाजता त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे माजी सैनिक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button