गोंदियाविदर्भ

पोलिस निवडणूक निरीक्षक हसीब उर रहमान यांची चेकपोस्टला भेट

गोंदिया : 64-तिरोडा विधानसभा मतदार संघासाठी नियुक्त केलेले पोलीस निवडणूक निरीक्षक हसीब उर रहमान यांनी गोरेगाव येथील चेकपोस्टला भेट देवून पाहणी केली.

विधानसभा निवडणूक आदर्श आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एस.एस.टी, एफ.एस.टी, व्ही.एस.टी., व्ही.व्ही.टी. यांच्यासह विविध पथकांचे गठण करण्यात आले आहे. निर्भय व मुक्त वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी चेकपोस्टवर वाहनांची कसून तपासणी करावी अशा सूचना त्यांनी दिल्या. यावेळी पोलीस निरीक्षक भुसारी, पोलीस उपनिरीक्षक सुजित घोलप, पोलीस निवडणूक अधिकाऱ्यांचे संपर्क अधिकारी तेजस कोंडे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button