
भंडारा : भारत निवडणुक स्वीप कार्यक्रमातंर्गत मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरीता 14 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 ते सायंकाळी 4.30 पर्यत वॉक फॉर डेमोक्रसी रॅली आयोजीत करण्यात आली आहे.
या रॅलीची सुरवात क्रिडा संकुल येथुन प्रारंभ होऊन महात्मा गांधी चौक येथुन शेवट त्रिमुर्ती चौकात समारोप होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्य निरीक्षक विजयकुमार गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते, मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी, पोलीस अधिक्षक नुरूल हसन, उपवनसंरक्षक राहुल गवई, उपविभागीय अधिकारी गजेंद्र बालपांडे यांच्यासह अन्य नोडल अधिकारी सहभागी होतील.



