गडचिरोलीविदर्भ

कोचीनारा येथे दारूविक्री बंदीसाठी महिलांचा एल्गार

कोरची : तालुक्यातील कोचीनारा ग्रामपंचायत येथे मुक्तिपथ अभियान तसेच गावकऱ्यांच्या पुढाकाराने संपूर्ण दारू विक्री बंदीचा निर्णय घेण्यात आला. आता कोणी दारूविक्री करताना आढळून आल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

गावामध्ये दारू विक्री सुरू आहे, त्यामुळे गावातील मद्यपी ना सहजच दारू उपलब्ध होते. त्यामुळे गावातील लोकांचे व्यसनाचे प्रमाण वाढले. परिणामी गावात झगडे, तंटे, गावातील शांतता भंग झाली, महिलांना घरगुती हिंसाचार वाढू लागला, मारहाण करणे, घरातील साहित्य दारूवाल्याच्या घरी गहाण ठेवणे, शाळकरी मुलींना त्रास होणे अश्या समस्या गावामध्ये वाढू लागल्या. या त्रासामुळे गावातील महिला एकवटल्या व दारू विक्री बंदीसाठी ग्रामपंचायतकडे मागणी केली.

दरम्यान, गावात आयोजित ग्रामसभेत अवैध दारूविक्री संपूर्ण बंद करण्याचा ठराव  एकमताने मंजूर करण्यात आला. ठरावाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाईसह दंड वसूल करण्याचेही ठरविण्यात आले. सभेत मुक्तिपथचे युवनाथ मेश्राम यांनी गावातून अवैध दारूविक्री हद्दपार करण्यासाठी ग्रामसभेला व ग्रामपंचायतला असलेले अधिकार सांगितले. सोबतच कायद्यांची माहिती देत मार्गदर्शन केले. यावेळी सुशीला देवांगन संघटना अध्यक्ष, जानकी नायक, बलसिया खोबा, पुसई जमकातन, पंचवती सोनबारसा, दिलबंती नाईक, शिवबती नाईक, फुकैना गायगोवल, ताराबाई दोगाईन, राधिका, दोगाईन, सीमा देवांगन, शारदा काटेंगे, रत्न शहारे, जैनकुमारी बागडेरिया, समशेर खा पठाण तंटामुक्ती अध्यक्ष, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. सभेचे प्रस्ताविक अरुणा गोंनाडे यांनी  केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button