गोंदियामुख्य बातमीविदर्भ

तणावग्रस्त पोलिसाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

पीएसआयसह तिघांनी मानसिक छळ केल्याचा आरोप

गोंदिया : कर्तव्य बजावताना तणावात असलेल्या एका पोलिसाने स्वतःच्या एसएलआर रायफलने गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि. १७) सायंकाळी गोंदिया तालुक्यातील बिरसी विमानतळावर घडली. राकेश पांडुरंग भांडारकर (३७, रा. पदमपूर, ता. आमगाव, जि. गोंदिया) असे आत्महत्या करणाऱ्या पोलिस शिपायाचे नाव आहे.

राकेश भांडारकर हे दोन ते तीन वर्षांपासून बिरसी विमानतळावर कर्तव्यावर आहेत. रविवारी पाइंटवर ड्यूटी असताना तेथील अधिकारी व काही सहकारी त्यांना इकडे-तिकडे पाठवित मानसिक त्रास देत होते. वारंवारच्या त्रासामुळे तणावात आलेल्या राकेश यांनी स्वतःजवळील असलेल्या एसएलआर रायफलने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे बोलले जाते.

राकेश भांडारकर यांची बहीण अरुणा भांडारकर यादेखील गोंदिया पोलिस दलात पोलिस कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. राकेशने दुपारी २ वाजून ४८ मिनिटांनी आपल्या बहिणीच्या मोबाइलवर एक मॅसेज पाठविला. राखीव लोक असताना मला पाइंटवरून बोलावत आहेत. माझ्या मरणाला कारणीभूत हे तीन लोक आहेत, असा मॅसेज टाकून त्या मॅसेजमध्ये एका पीएसआयसह तिघांची नावे टाकली आहेत.

आपल्या कामात व्यस्त असलेल्या अरुणा भांडारकर यांनी मोबाइलला हात न लावल्यामुळे त्यांनी भावाचा मॅसेज पाहिला नव्हता. सायंकाळ होताच त्यांच्या मोबाइलवर फोन आल्यानंतरच राकेशच्या मृत्यूची बातमी त्यांना समजली. त्यानंतर त्यांनी मोबाइलवर आलेला मॅसेज पाहिला व लगेच बिरसी विमानतळाच्या दिशेने धाव घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button