
तुमसर रोड रेल्वे स्थानकाच्या आउटरवर अपघात
तुमसर : ओडिशा राज्यात जाणाऱ्या एका सुपरफास्ट ट्रेनमधून पडून एक प्रवासी रेल्वे खाली कटून जागीच ठार झाला. त्या प्रवाशाची ओळख अद्याप पटलेली नाही. स्थानिक रेल्वे प्रशासनाने या अपघाताची माहिती गोंदिया जीआरपीला दिली आहे. हा अपघात तुमसर रोड रेल्वे स्थानकात शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास घडला.
ओडिशा राज्यात जाणारा एक अनोळखी रेल्वे प्रवासी रेल्वेतून पडून रेल्वे ट्रॅक खाली आला. त्याच्या शरीराच्या कमरेखालून रेल्वे गेल्याने कटून तो जागीच ठार झाला. तुमसर रोड रेल्वे स्थानकाच्या आउटर जवळ हा अपघात घडला. स्थानिक रेल्वे प्रशासनाने याबाबत गोंदिया जीआरपीला कळविले असून गोंदिया जीआरपी घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी पंचनामा केला. मृत इसम सुमारे ५० वर्षीय आहे. सुपरफास्ट रेल्वेत प्रचंड गर्दी होती, असे स्थानिकांनी सांगितले. त्यामुळे प्रवाशाच्या धक्क्यात पडून तो रेल्वे ट्रॅक खाली आला असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.



