विमा कंपनीकडून मृतकाच्या कुटुंबीयास १ कोटी १५ लाख रुपयांची मदत

गडचिरोली : २०२१ मध्ये दिवाळीच्या सणात पोलिस स्टेशन गडचिरोली समोर सुंदरम फायनान्सचे मॅनेजर दुर्गेश नंदनवार यांचे ट्रकखाली चिरडून अपघाती निधन झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी आई आणि वडील यांच्या वतीने विमा कंपनी कडून १ कोटी ७८ लाखाची भरपाई देण्यात यावी असा दावा गडचिरोली न्यायालयात दाखल करण्यात आला होता.
त्या दाव्यात आज दोन्ही पक्षांची तडजोड होऊन १ कोटी १५ लाख रुपये मृतकाच्या कुटुंबीयांना देण्याचा विमा कंपनी कडून ठरविण्यात आले आहे. त्या नुसार न्यायालयाच्या आदेशानुसार मृतकाच्या पत्नीला ३०%, आई आणि वडील यांना ३०% आणि अज्ञान मुलाला ४० %, रक्कम असे एकूण १ कोटी १५ लाखाचा चेक मृत्काच्या कुटुंबाला देण्यात आला. मृतकाच्या अज्ञान मुलाला त्याचे नावाने ४०% रक्कम राष्ट्रीय कृत बँकेत ठेवीच्या स्वरूपात ठेवून त्यावर मुलगा १८ वर्षाचा होई पर्यंत दर साल दर शेकडा ७.५% दराने व्याज आकारणी करून संपूर्ण रक्कम मुलगा १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर पूर्ण रक्कम देण्याचे आदेश देऊन दावा निकाली काढण्यात आला.



