
धानोरा : राष्ट्रीय लोकसंख्या शिक्षण प्रकल्प 2024-25 अन्वये “इंटरनेटचा सुरक्षित वापर आणि मीडिया साक्षरता” या विषयावर राज्यस्तरीय भूमिका अभिनय स्पर्धा 21 डिसेंबर रोजी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे येथे येथे संपन्न झाली. राज्यस्तरावर झालेल्या स्पर्धेमध्ये 12 विभागातील 8 चमूंनी भाग घेतला होता. त्यामध्ये जिल्हा परिषद हायस्कूल धानोराच्या चमूने तृतीय क्रमांक पटकावत गडचिरोली जिल्ह्याची मान उंचावली. सदर स्पर्धेमध्ये नुमान खलील शेख, करण किशोर बसु, विपश्य रितेश मशाखेत्री, नंदिनी नरेश उसेंडी, साक्षी कालिदास पदा या विद्यार्थ्यांनी अभिनय सादर केला. यासाठी रजनी मडावी आणि भालेराव सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
राज्यस्तरावर तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या चमुचे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे संचालक राहुल रेखावार, शिक्षणाधिकारी पवार, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य चौरे, अधिव्याख्याता चापले, डॉ. विनीत मते, अधिव्याख्याता राठोड, गटशिक्षणाधिकारी सुधीर आखाडे , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वेणू म्हशाखेत्री, उपाध्यक्ष जमीर कुरेशी, मुख्याध्यापक सुरजुसे, दुगा मॅडम, शर्मिष्ठा धाईत, पौर्णिमा मडावी, पी.व्ही. साळवे, डॉ. रश्मी डोके, तोटावार, एन.बी. मेश्राम, अशोक कोल्हटकर, दशमुखे मॅडम, कोरेवार मॅडम, आनंदवार मॅडम, चलमेलवार मॅडम, ओम देशमुख, प्रमोद सहारे, देवकात्ते तथा सर्व कर्मचारी वृंदांनी अभिनंदन केले आहे.



