वर्धाविदर्भ

शौचालयाच्या खड्ड्यात पडून चिमुकल्याचा मृत्यू

हिंगणघाट येथील घटना ; पोलिसांनी केली आकस्मिक मृत्यूची नोंद 

वर्धा : खेळता खेळता शौचालयाच्या खड्यात पडल्याने खड्यातील पाण्यात बुडून अडीच वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना हिंगणघाट शहरातील संत ज्ञानेश्वर वॉर्डात उजेडात आली. याप्रकरणी २४ रोजी हिंगणघाट पोलिसात तक्रार दाखल केली.

देवांश कैलास चकोले असे मृत बालकाचे नाव आहे. देवांश हा बाहेर खेळत होता. मात्र, तो घरी न दिसल्याने त्याच्या आई वडिलांनी शोध घेतला. पण, कोठेही दिसत नसल्याने घरच्यांनी व शेजाऱ्यांनी त्याचा शोध घेतला असता चकोले यांच्या घरामागे मनोहर दरवरे यांच्या घराचे बांधकाम सुरू असलेल्या शौचालयाच्या खड्यातील पाण्यात तळाला बुडालेला दिसून आला.

घरच्यांनी त्याला तत्काळ पाण्याबाहेर काढून हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ नेले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी देवांशला मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेमुळे चकोले कुटुंबावर शोककळा पसरली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button