गडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

भाजपच्या सदस्य नोंदणी मोहिमेला गती देण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने काम करावे – माजी खा. अशोक नेते यांचे आवाहन

गडचिरोली येथे तालुका कार्यशाळेचे आयोजन

गडचिरोली : भाजपची सदस्य नोंदणी मोहीम ही देशाच्या राजकीय व सामाजिक विकासासाठी महत्त्वपूर्ण आहे. नव्या सदस्यांना पक्षाच्या विचारसरणीची सखोल माहिती देण्यासाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे. गडचिरोली ग्रामीण आणि जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्त्यांसाठी हा कार्यक्रम संघटनात्मक एकतेचे दर्शन घडवणारा ठरेल. सदस्य नोंदणी मोहिमेला अधिक गती देण्यासाठी प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम करण्याचे आवाहन माजी खासदार अशोक नेते यांनी केले.

भारतीय जनता पार्टी, गडचिरोली तालुका ग्रामीणच्या वतीने संघटन पर्व अंतर्गत देशव्यापी सदस्य नोंदणी अभियानाच्या निमित्ताने २८ डिसेंबर रोजी साई मंदिर हॉल, चामोर्शी रोड, गडचिरोली येथे तालुका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचे उद्घाटन दीपप्रज्वलन करून माजी खा. नेते यांनी केले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, माजी आ. डॉ. नामदेवराव उसेंडी, विधा. संयोजक प्रमोद पिपरे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा महामंत्री योगिता पिपरे, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर, तालुकाध्यक्ष विलास भांडेकर, तालुका प्रभारी भास्कर बुरे, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, तालुका महामंत्री बंडू झाडे, रमेश नैताम यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यशाळेने गडचिरोली तालुक्यातील भाजपच्या संघटनात्मक कार्याला बळकटी मिळेल आणि सदस्य नोंदणी मोहिमेला नवी दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button