
तळेगाव मार्गावरील पूल परिसरात गुन्हे शाखेची कारवाई ; वाहन सोडून आरोपी पसार
वर्धा : महागड्या कारमधून देशी-विदेशी दारूची वाहतूक केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नाकाबंदी करीत कारवाई केली. या कारवाईत कारसह ५ लाख ९५ हजार ७५० रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने आर्वी तालुक्यातील तळेगाव मार्गावरील पूल परिसरात केली. सतनामसिंग बावरी, रा. वर्धमनेरी, तळेगाव असे पसार आरोपीचे नाव आहे.
अवैधरीत्या दारूची वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्या आधारावर संशयित वाहनाचा शोध घेत त्याचा पाठलाग करून वाहन अडविले असता नमूद आरोपी जागेवरून पसार झाला. त्याचा इतरत्र शोध घेतला असता तो मिळून आला नाही. कारची झडती घेतली असता एमएच ३१ बीबी ३४७१ क्रमांकाची कार १८० एमएलच्या ११३ शिष्या, विदेशी कंपनीच्या बीअरचे १२ डब्बे, देशी दारूच्या ३८४ शिशा, ९० एमएलने भरलेल्या देशी दारूच्या ९५० शिशा असा ५ लाख ९५ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक अनुराग जैन, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक विनोद चौधरी, नरेंद्र पाराशर, नितीन इटकरे, सागर भोसले, संघसेन कांबळे, मिथुन जिचकार यांनी केली.



