क्राईमगोंदियामुख्य बातमीविदर्भ

घाटकुरोडा रेती घाटावर जिल्हा प्रशासनाची कारवाई ; सात पोकलँड, चार टिप्परसह करोडोंचा मुद्देमाल जप्त

११ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

गोंदिया : तिरोडा तालुक्यात वाळू खाणींचा लिलाव झालेला नसला तरी, मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर उत्खनन आणि वाळू वाहतूक होत असल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांनी तिरोडा महसूल विभागाकडे केल्या आहेत. तथापि, महसूल विभागाने या प्रकरणाकडे लक्ष न दिल्याने, नागरिकांच्या तक्रारींच्या आधारे, गोंदिया जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांनी ११ जानेवारी रोजी छापा टाकून सात पोकलँड, चार टिप्पर आणि ६,५०० ब्रास वाळू जप्त केली.

तिरोडा तालुक्यातील वैनगंगा नदीवरील वाळू खाणीतून २४ तास बेकायदेशीर वाळू उत्खनन आणि वाहतूक सुरू असल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांनी तिरोडा महसूल आणि पोलिस विभागाकडे केल्या होत्या. परंतु कोणतीही कारवाई न झाल्याने, अवैध उत्खनन आणि वाळूची तस्करी सुरूच राहिली. नागरिकांकडून तक्रारी होत असल्याचे पाहून जिल्हा दंडाधिकारी प्रजीत नायर आणि जिल्हा पोलिस अधीक्षक गोरख भामरे ११ जानेवारी रोजी घाटकुरोडा घाटावर पोहोचले. माहिती मिळताच तिरोडा महसूल विभागात खळबळ उडाली. तहसीलदार नारायण ठाकरे, नायब तहसीलदार मोहोरकर, विभागीय अधिकारी, तलाठी श्रीमती पटेल, आनंद भुते, सुजित पवार, तहसील कार्यालयातील लिपिक कुर्वे, ठाकरे, महसूल कर्मचारी, तिरोडा पोलीस निरीक्षक अमित वानखडे यांनी त्यांच्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचून सुरू असलेल्या वाळू तस्करीचा पर्दाफाश केला. घाटकुरोडा घाटावर बेकायदेशीर कामे उघडकीस आली आणि कारवाई करण्यात आली. या कारवाईत ४ टिप्पर आणि ७ पोकलँडमशीनसह ३ कोटी ४२ लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला. तसेच, अज्ञात चालक-मालकासह ११ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. वाळू तस्करांविरुद्ध केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे, त्यामुळे वाळू तस्करांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

ही कारवाई जिल्हा दंडाधिकारी प्रजित नायर, पोलिस अधीक्षक गोरख भामरे, तिरोड्याचे तहसीलदार नारायण ठाकरे, पोलिस निरीक्षक अमित वानखडे, ए.पी. मोहनकर, पी.बी. निमजे, बी.डी. पटेल, साजू बांते, ए.पी. भुते, रत्नदीप प्रकाश चौरे यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button