गडचिरोलीचंद्रपूरविदर्भ

देसाईगंज येथून अपहरण झालेला मुलगा पोहोचला बल्लारशाहला!

गडचिरोली : देसाईगंज येथील एका बालकाचे अपहरण करण्याचा प्रयत्न नागरिकांच्या सतर्कतेमुळे बल्लारशाह येथे उघडकीस आला. श्रेयश चंद्रकुमार दुबे (वय १२) असे या मुलाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, देसाईगंज येथील श्रेयस दुबे सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास सायकलने ट्युशनला जात असताना तीन ते चार व्यक्तींनी त्याला गुंगीचे औषध देऊन अपहरण केले. त्याला रेल्वेने नेत असताना बल्लारशाह येथे संशय आल्याने जावेद नामक व्यक्तीच्या सतर्कतेमुळे डाव फसला. जावेदने मुलाला वाचवून रेल्वे पोलिसांच्या स्वाधिन केले. अपहरणकर्ते तीन ते चार जण आहेत. सध्या श्रेयस बल्लारशाह रेल्वे पोलिसांकडे असून चंद्रकुमार दुबे, नरेश विठ्ठलानी व मित्र परीवार त्याला आणण्यासाठी बल्लारशाहला रवाना झाले आहेत. देसाईगंज शहरात मुलांचे अपहरण करणारी टोळी सक्रिय असून लहान मुलांना कुठेही एकटे पाठवू नये, संशयीत हालचाली आढळल्यास पोलिस स्टेशनला तत्काळ कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button