गडचिरोलीविदर्भ

रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

देसाईगंज तालुक्यातील चोप येथील घटना

देसाईगंज : तालुक्यातील चोप येथे एका वृद्ध शेतकऱ्यावर रानडुकराने हल्ला चढविला. यात शेतकरी गंभीर जखमी झाला. ही घटना १६ रोजी सायंकाळी घडली.

भिका सोमा नेवारे (८०, रा. चोप, ता. देसाईगंज) असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. ते १६ रोजी सायंकाळच्या सुमारास काम करत होते. रानडुकराने हल्ला चढविल्याने पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्रथमोपचारानंतर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. चोप, कोरेगाव, डोंगरमेंडा, बोळधा, अक्कलपूर, शंकरपूर, कसारी या परिसरात बिबट्या, अस्वल, रानडुकरासह हरणांच्या कळपाने रब्बीच्या पिकामध्ये हैदोस मांडलेला आहे. यावर्षी या परिसरात २४ तास वीज मिळत नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी मक्याची लागवड केली आहे. मका पिकामध्ये सुद्धा रानटी डुक्कर, हरणांचे कळप नासधूस करत आहेत.

दरम्यान, १४ रोजी देसाईगंज येथे शेतात काम करत असलेल्या एका शेतकऱ्यावर वाघाने हल्ला चढविला होता. मात्र, सुदैवाने शेतकऱ्याने आरडाओरड केल्याने वाघाच्या तावडीतून सुटका झाली. यानंतर चोपमध्ये वृद्धावर रानडुकराने हल्ला केला. तीन दिवसांत दोन घटना घडल्याने वन्यप्राण्यांची दहशत निर्माण झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button