गडचिरोलीविदर्भ

दारूविक्रेत्याच्या घरातून दारूसह 38 हजारांचा मुद्देमाल जप्त, गुन्हा दाखल

गडचिरोली : भामरागड नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या ताडगाव येथे पोलिस व मुक्तिपथ टीमने संयुक्त कारवाई करीत दोन फ्रिजसह बियर दारू असा एकूण अंदाजे 38 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी संबंधित विक्रेत्यावर ताडगाव पोलिस मदत केंद्र येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भामरागड शहरात अवैध दारूविक्रीचे प्रमाण कमी झाल्याने येथील मद्यपी ताडगाव येथे जाऊन दारू पितात. तालुका मुख्यालयापासून 12 किमी असलेल्या या गावात 4 ते 5 दारू विक्रेत्यांच्या माध्यमातून दारूविक्री सुरू असल्याची माहिती मिळाली. दरम्यान, एका घरातून दारू विक्री सुरू असल्याचे कळताच ताडगाव पोलिस व मुक्तिपथ टीमने संयुक्तरीत्या एका घरी धाड टाकून तपासणी केली असता, दोन फ्रीजमध्ये बियर दारूच्या बॉटल मिळून आल्या. पोलिसांनी पंचनामा करून दोन फ्रीज व दारू असा एकूण जवळपास 38 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी संबंधित विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. कारवाईमुळे इतर विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

ही कारवाई ताडगाव पोलिस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी गजानन कुबडे यांच्या नेतृत्वात पोलिस कर्मचाऱ्यांनी केली. यावेळी मुक्तिपथ तालुका संघटिका नीळा किन्नाके उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button