
कोटगल येथे नागोबा देव यात्रा महोत्सव
गडचिरोली : जिल्ह्याच्या मुख्याल्यापासून ७ किमी अंतरावर असणाऱ्या कोटगल गावातील वैनगंगा नदीलगत “नागोबा देव” हे कोटगल गावाचे दैवत असलेले ठिकाण आहे. कोटगल गावात ‘नागोबा देव’ या ठिकाणी दरवर्षी मोठी यात्रा भरते. यावेळी हजारोच्या संख्येने नागोबा देव भक्तगन दर्शन घेण्यासाठी कोटगल या ठिकाणी येत असतात.
नागोबा यात्रा महोत्सव निमित्ताने यावेळी ‘भूक’ या नाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. या नाट्य प्रयोगाचे उद्घाटन अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी अम्ब्रीशराव आत्राम यांनी नागोबा यात्रा महोत्सव निमित्ताने देवस्थानाचे भेट घेतली आणि नागोबा देवाचे विधिवत पूजन करून आशीर्वाद घेतला. “भूक”या नाट्य प्रयोगाचे उद्घाटन करून नागरिकांना मार्गदर्शन केले. तसेच मंदिर परिसरात महाप्रसादाचे वितरण करत समस्त जनतेला नागोबा देव यात्रा महोत्सव निमित्ताने शुभेच्छा दिल्या.
यावेळी युवा नेते कुमार अवधेशरावबाबा आत्राम, कोटगल ग्रामपंचायतच्या सरपंच ममता दूधबावरे, मुकेश नामेवार, श्रीकांत नामनवार, रणजीत रामटेके, गावडे, मोहिनी ठाकरे आणि मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते.



