
भंडारा : महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंतर्गत सामाजिक न्याय विभागाच्या वतीने नागपूर येथून बोधगया येथे नागरिक विशेष रेल्वेने रवाना झाले.
काल रात्री वरठी भंडारा रोड रेल्वे स्टेशन येथून ही रेल्वे रवाना झाली. सहायक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांनी रेल्वेला हिरवी झेंडी दाखविली. रवाना होण्यापूर्वी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी दूरध्वनीवरून प्रवाशांना शुभेच्छा दिल्या. 60 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रेचा लाभ घेता यावा यासाठी शासनाने मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत भंडारा येथून हे ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले आहेत.



