गडचिरोलीविदर्भ

राज्य सरकारने कवंडे गावाचा सर्वांगीण विकास करून नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्या

राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे यांची मागणी 

गडचिरोली : जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील अतिसंवेदनशील, अतिदुर्गम, छत्तीसगड सीमेवरील अतिशय शेवटच्या टोकावर वसलेल्या कवंडे या गावात राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे यांनी सदिच्छा भेट दिली व या गावातील नागरिकांसोबत संवाद साधला.

या गावातील नागरिक आजही राज्य शासनाच्या अनेक योजनांपासून वंचित आहेत, त्यामुळे राज्य सरकारने कवंडे गावाचा सर्वांगीण विकास करून नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्या अशी मागणी प्रणय खुणे यांनी यावेळी केली. कवंडे गावातील नागरिक आजही उपेक्षित जीवन जगत आहेत. आजही अनेक राज्य सरकारच्या सोयी-सुविधा या गावात पोहोचले नाही गावातील अंतर्गत रस्ते, नाली तसेच अनेक मूलभूत सोयीसुविधा आजपर्यंत सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचल्या नाही. याबाबत राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय खुणे यांनी खंत व्यक्त केली.

गडचिरोली जिल्ह्यातील तमाम शेवटच्या टोकावरील गावांचा विकास झालाच पाहिजे व सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून त्यांचा हक्क व अधिकार त्यांना मिळालाच पाहिजे. यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार संघटना गडचिरोली जिल्ह्यात कार्य करीत आहे व शेवटच्या टोकापर्यंतच्या लोकांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही, तोपर्यंत राष्ट्रीय मानवाधिकार संघटना कार्य करीत राहील असे प्रतिपादन मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे यांनी केले.

यावेळी मानवाधिकार संघटना प्रदेश उपाध्यक्ष भारत खटी, राष्ट्रीय मानवाधिकार संघटन प्रवक्ता ज्ञानेंद्र विस्वास, विदर्भ मानवाधिकार संघटन अध्यक्ष जावेद शेख, जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, जिल्हा उपाध्यक्ष मुन्ना डहारे, एटापल्ली तालुका अध्यक्ष स्वप्नील मडावी, भामरागड तालुका अध्यक्ष भीमराव वनकर, मानवाधिकार संघटना नेते महेश खुणे व पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button