
गडचिरोली : आष्टी-गडचिरोली मार्गावरील उमरीजवळील वळणावर ट्रकची दुचाकीला जबर धडक बसल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना 27 फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास घडली. अमीत एकनाथ चहाकाटे (वय 23) रा. कोनसरी ता. चामोर्शी असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे.
अमीत हा कोनसरी या आपल्या स्वगावावरून आष्टीकडे येत दुचाकीने येत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने दुचाकीला जबर धडक दिली. डोक्याला जबर मार लागल्याने अमितचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलिस घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी आष्टी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. घटनेचा पुढील तपास आष्टी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.



