भंडाराविदर्भ

शंभर दिवस कृती कार्यक्रमात वैशिट्यपूर्ण उपक्रम प्रभावीपणे राबवा

पालक सचिव आभा शुक्ला यांनी घेतला आढावा

भंडारा : राज्य शासनाने 100 दिवसांच्या कृती आराखड्याबाबत जिल्हयातील महत्वाचे प्रश्न असल्यास त्याचा मंत्रालयीन पातळीवर पाठपुरवठा करण्याचे आश्वस्त करत, या शंभर दिवसात 9 प्रमुख मुद्याखेरीज वैशिट्यपूर्ण उपक्रम प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश अतिरीक्त मुख्य सचिव उर्जा तथा पालक सचिव आभा शुक्ला यांनी यंत्रणांना दिले.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींदकुमार साळवे यासह सर्व विभागप्रमुख अधिकारी उपस्थित होते. यावेळी महाउर्जा विभागाचे सौर उर्जीकरणाचे सादरीकरण महाउर्जातर्फे करण्यात आले. सौर उर्जीकरणासाठी शासन आग्रही असून शेतीला सुध्दा सौर उर्जेव्दारे विद्युत पुरवठा करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. लोकाभिमुख होऊन काम करण्याचे निर्देश पालक सचिवांनी दिले.

जिल्हाधिका-यांनी केले सादरीकरण : यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कोलते सादरीकरणात 100 दिवस कृती आराखडा अंतर्गत विभागांचे संकेतस्थळ अपडेट करणे, ‘ईज ऑफ लिव्हिंग’ संकल्पनेवर काम करणे, व्हॉट्सॲप चॅटबोट, जनतेच्या तक्रारींचे नियोजन, कार्यालयातील सोयीसुविधा, स्वच्छता, जिल्ह्यातील पायाभूत सुविधा व सुरू असलेले प्रकल्प, गुड गव्हर्नन्स आदींचे सादरीकरण केले. अन्य विभागप्रमुखांनीही वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांचे सादरीकरण केले.

यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत जिल्हयातील उमेद बचतगटांच्या प्रगतीचा आढावा घेतला. रेशीम कार्यालय, कृषी, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आदींच्या वैशिष्ट्यपूर्ण कामाचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. जिल्हयातील जलपर्यटन, राजमार्ग व रस्ता दुरूस्ती, संरक्षक भिंत बांधकाम, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय याबाबतही सादरीकरण करण्यात आले.

जिल्हयातील यंत्रणांची महत्वाची कामे ज्याबाबत मंत्रालय पातळीवर पाठपुरावा आवश्यक आहे, त्याबाबत संपर्क व समन्वय करण्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सगळयात शेवटी जिल्हयातील रिक्त पदांची माहितीही त्यांनी घेतली. कौशल्य विकास, समाजकल्याण, महसूल, नियोजन या विभागातील रिक्त पदांच्या भरतीबाबत शासनाशी संवाद करण्याचे त्यांनी आश्वस्त केले.

100 दिवसांच्या कृती आराखड्यामध्ये, शासकीय कार्यालयांचे संकेतस्थळ अद्ययावत करणे, ‘ईज ऑफ लिव्हिंग’ संकल्पनेवर काम करणे, शासकीय कार्यालयात स्वच्छता मोहीम राबविणे, नागरिकांच्या तक्रारी, प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढणे, आदी 9 मुद्द्यांचा समावेश आहे.

शासकीय कार्यालयात येणा-या नागरिकांचे समाधान होईल, अशी वर्तणूक त्यांना देणे आवश्यक आहे. 15 एप्रिल 2025 च्या आत कृती आराखड्यानुसार दिलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन श्रीमती शुक्ला यांनी  केले. यावेळी पोलीस दलातील आयएसओ मानांकन प्राप्त पोलीस स्टेशनचे अधिकारी यांचा आयएसओ प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button