गडचिरोलीविदर्भ

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सदस्य नोंदणीला सुरुवात

जिल्ह्यात 25000 सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट

गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्यालयात प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सदस्य नोंदणीला सुरुवात करण्यात आली. जिल्हा अध्यक्ष रवींद्र वासेकर यांनी माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी यांच्याकडून स्वतःचे फार्म भरून घेतले व सदस्य नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जिल्ह्यात 25000 सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट ठेवले असून कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा अध्यक्ष रवींद्र वासेकर व माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी यांनी केले.

यावेळी प्रदेश सरचिटणीस युनूस शेख, जिल्हा उपाध्यक्ष योगेश नांदगाये, जिल्हा सचिव कपिल बागडे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा डॉ. सोनल कोवे, जिल्हा नियोजन समितीच्या माजी सदस्या कल्पना तिजारे, महिला जिल्हा कार्याध्यक्षा सुषमा येवले, रुषाली भोयर, गडचिरोली तालुकाध्यक्ष विवेक बबनवाडे, आरमोरी तालुका अध्यक्ष अमीन लालानी, कार्याध्यक्ष सुनील नंदनवार, गडचिरोली शहर अध्यक्ष अमोल कुळमेथे, आरमोरी शहर अध्यक्ष प्रदीप हजारे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष चेतन पेंदाम, ओबीसी जिल्हाध्यक्ष संजय शिंगाडे, आरमोरी तालुका महिला अध्यक्षा संगीता मेश्राम, गडचिरोली शहर अध्यक्षा प्रीती कोवे, आरमोरी शहर अध्यक्षा जयश्री भोयर, उमा बन्सोड यांच्यासहित पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button