गोंदियाविदर्भ

विवाहित युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

गोंदिया : घरुन निघून गेलेल्या विवाहित युवकाचा मृतदेह शिरपूरबांध धरण परिसरातील एका झाडाला गळफास लावलेल्या स्थिती आढळल्याची घटना सोमवारी (दि. ३१) सकाळी देवरी तालुक्यातील शिरपूरबांध येथे उघडकीस आली. सुनील शंकर सातार (२८) रा. शिरपूरबांध, ता. देवरी असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

शिरपूरबांध येथील सुनील सातार हा विवाहित युवक रविवारी (दि.३०) सकाळी आठ ते नऊ वाजताच्या दरम्यान त्याची मोटारसायकल घेऊन घरून निघून गेला होता. परंतु तो घरी परत न आल्याने त्याच्या कुटुंबीयांनी सर्वत्र शोधाशोध केली असता त्याची मोटारसायकल क्रमांक एमएच १२ एसजे ६१९४ ही शिरपूबांध धरणाच्या प्रवेशद्वाराजवळ आढळली. यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी रविवारी सायंकाळपर्यंत धरण परिसरात त्याचा शोध घेतला परंतु सुनीलचा कुठेच पत्ता लागला नाही. सोमवारी सकाळी परत याच परिसरात त्याच्या कुटुंबीयांनी शोधाशोध करीत असताना सकाळी आठ वाजताच्या दरम्यान सुनीलचा मृतदेह एका झाडाला गळफास घेतल्याच्या स्थितीत आढळला. या घटनेची माहिती देवरी पोलिस स्टेशनला देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मोका पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालय देवरी येथे पाठविला. सुनील सातार या युवकाने नेमक्या कुठल्या कारणावरून आत्महत्या केली हे अद्यापही स्पष्ट झाले नाही. याप्रकरणाचा तपास देवरी पोलिस करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button