
सिरोंचा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (अ.प.) आढावा बैठक
सिरोंचा : आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनात सिरोंचा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (अ.प.) आढावा बैठक संपन्न झाली. सदर आढावा बैठकीला कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी प्रामुख्याने हजेरी लावली होती. बैठकीत विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्षप्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर व युवती राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा तनुश्री बाबा आत्राम यांनी कार्यकर्त्यांच्या गळ्यात पक्षाचा दुपट्टा टाकत त्यांचे पक्षांमध्ये स्वागत केले.
जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसेच कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरणे सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन तनुश्री आत्राम यांनी केले. कार्यक्रमाला माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धनरावबाबा आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, माजी आ. रामकृष्ण मडावी, तालुकाध्यक्ष मधुकर कुलुरी, अमोल कुळमेथे, जिल्हा महिला उपाध्यक्ष वेंकटलक्ष्मी अरवली, समया पसुला, नगरसेवक जगदीश रालाबंडीवार, आरमोरी तालुका कार्याध्यक्ष सुनील नंदनवार, नगरसेवक सतीश भोगे सिरोंचा, नगरसेवक सतीश राचर्लावार आदी मान्यवर उपस्थित होते.



