गडचिरोलीविदर्भ

विविध मागण्यांसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने १ मे रोजी धरणे आंदोलन

गडचिरोली : स्वतंत्र विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने विदर्भातील जनतेच्या विविध मागण्यांसाठी गुरुवार, १ मे रोजी येथील इंदिरा गांधी चौकात धरणे आंदोलन दुपारी १२ ते ४ या वेळेत करण्यात येणार आहे.

स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीची मागणी १२० वर्षे जुनी असून, विदर्भ राज्य निर्मितीकरिता नेमलेल्या वेगवेगळ्या आयोगाने विदर्भराज्य निर्माण करण्याच्या शिफारशी करूनसुद्धा विदर्भाच्या जनतेच्या विरुद्ध १ मे १९६० ला विदर्भाला महाराष्ट्रात सामील करून घेतले. विदर्भावर अन्याय सुरू आहे. ग्रामीण भागातील विजेचे लोडशेडिंग बंद करण्यात येऊन शेतकऱ्यांना २४ तास वीज पुरविण्यात यावी या व इतर मागण्यांच्या बाबतीत हे आंदोलन होत आहे, अशी माहिती समिती जिल्हा समन्वयक अरुण मुनघाटे यांनी दिली.

स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करावे, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी, अन्नधान्यावरील जीएसटी रद्द करावी, गडचिरोलीत शासकीय अभियांत्रिकी महाविद्याय निर्माण करावे आदी मागण्यांना घेऊन हे आंदोलन करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button