
गडचिरोली : जागतिक दारिद्र्य आणि शोषणाच्या व्यवस्थेवर प्रकाश टाकून, समानता प्रस्थापित करण्यासाठी गरीब, कष्टकरी, कामगार, शेतकरी आणि शेतमजुरांना भांडवलशाहीविरोधात लढण्याचा संदेश देणारे महान तत्त्वज्ञ आणि विचारवंत कार्ल मार्क्स यांच्या जयंतीनिमित्त शेतकरी कामगार पक्षाने विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कार्ल मार्क्स यांची 207 वी जयंती सोमवार, 5 मे 2025 रोजी दुपारी 12 वाजता पक्षाच्या गडचिरोली जिल्हा कार्यालयात साजरी होणार आहे.
कार्यक्रमात “मार्क्स कोण होता?” या विषयावर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच, कार्यकर्त्यांसाठी विशेष भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम जिल्हा कार्यालय, मच्छी मार्केटच्यावर, चंद्रपूर रोड, गडचिरोली येथे आयोजित करण्यात आला आहे.
शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांनी जिल्हा, तालुका आणि गाव समितीचे पदाधिकारी, सदस्य आणि कार्यकर्त्यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.



