क्राईमगडचिरोलीविदर्भ

गेदा डाकघरात लाखोंचा गैरव्यवहार उघड ; डाकपालावर फसवणुकीचा गुन्हा

एटापल्ली : तालुक्यातील गेदा येथील डाकघरात नागरिकांनी जमा केलेल्या लाखो रुपयांच्या रकमेचा गैरव्यवहार डाकपालाने केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी 1 मे रोजी एटापल्ली पोलीस ठाण्यात डाकपालावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेंद्र साईनाथ वैरागडे (रा. चंदनवेली, ता. एटापल्ली) असे आरोपी डाकपालाचे नाव आहे. गडचिरोली डाक कार्यालयातील निरीक्षक श्रीहरी कुंभार यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, 2018 ते 2022 या कालावधीत नागरिकांनी विविध योजनांतर्गत डाकघरात जमा केलेली रक्कम सुरेंद्र वैरागडे याने त्यांच्या खात्यात जमा न करता स्वतःच्या फायद्यासाठी वापरली.

या गैरव्यवहाराची माहिती एका खातेदाराने तक्रार केल्यानंतर उघडकीस आली. आलापल्लीचे डाक निरीक्षक जितेंद्र कुमार यांनी गेदा डाकघराची तपासणी केली. तपासणीनंतर डाकपाल वैरागडे याला नोटीस बजावून खुलासा मागविण्यात आला. विचारपूस केली असता, जमा झालेली रक्कम त्याने स्वतः खर्च केल्याचे कबूल केले. कारवाईच्या भीतीने सुरेंद्र वैरागडे याने एक लाख रुपये पोस्ट खात्यात जमा केले. यासोबतच काही रक्कम खातेदारांना परतही केली. मात्र, या गैरव्यवहारानंतर त्याला नोकरीवरून बडतर्फ करण्यात आले. गैरव्यवहार उघडकीस आल्याने अखेर त्याच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक रोहिणी गिरवलकर करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button