गडचिरोलीविदर्भ

देसाईगंजमध्ये केंद्र सरकारच्या जातीय जनगणनेच्या निर्णयाचा जल्लोष

भाजप कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतिषबाजी ; ‘मोदी सरकारचा विजय असो’च्या घोषणा

देसाईगंज : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने जातीय जनगणनेच्या ऐतिहासिक निर्णयाला मंजुरी दिल्यानंतर देसाईगंजमध्ये भारतीय जनता पार्टीच्या (भाजप) कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करून या निर्णयाचे स्वागत केले.

यावेळी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णा गजबे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, राजेश जेठानी, तालुकाध्यक्ष सुनील पारधी, शहराध्यक्ष सचिन खरकाटे, जिल्हा सचिव सचिन वानखेडे, माजी बालकल्याण सभापती रोशनी पारधी भाजपा तालुका महामंत्री योगेश नागतोडे, महामंत्री मोहन पाटील गायकवाड, महामंत्री वसंता दोनाडकर, गोपाल उईके, अश्विनी कांबळे, सदानंद ठाकरे, जोतू तेलतुंबडे, केवळराम झोडे, कुलदीप आमले, हिरालाल शेंडे, कैलास पारधी, कपिल बोरकर, चंद्रकांत रणदिवे, शंकर पारधी, चक्रधर नाकाडे, सरपंच धनंजय तिरपुडे, सरपंच केवळराम टिकले, अजय राऊत, रवी प्रधान, पवन मेश्राम, सुशील पोरेड्डीवार, यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माजी आमदार कृष्णा गजबे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘देशात जातिनिहाय जनगणना’ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून न्याय हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या लोकांना यश मिळाले आहे. जनतेच्या हितासाठी काम करणे ही केंद्र सरकारची प्राथमिकता आहे.”

“सामाजिक न्यायाच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे. संविधानाने दिलेला समान संधीचा अधिकार प्रत्यक्षात आणण्यासाठी ही जनगणना आधारस्तंभ ठरेल. यामुळे राजकीय आणि सामाजिक प्रतिनिधित्वाच्या मागण्यांना आधार मिळणार असून, ज्या जातींना त्यांच्या लोकसंख्येनुसार राजकीय प्रतिनिधित्व मिळालेले नाही, त्यांच्या मागण्या पूर्ण करणे सोपे होईल,” असेही गजबे यांनी सांगितले.

भाजप तालुकाध्यक्ष सुनील पारधी म्हणाले, “केंद्र सरकारने नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत जातीनिहाय जनगणना करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. भारतामध्ये ओबीसी समाजातील बांधवांना याचा सर्वाधिक आनंद झाला आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर १९५१ पासून जनगणना झाली नव्हती. सर्वपक्षीय आणि सर्व स्तरांतून मागणी असतानाही यापूर्वीच्या कोणत्याही सरकारने हा निर्णय घेतला नव्हता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतल्यामुळे भारतातील बहुजन समाजाला आणि मागासलेल्या जातींना पुढे येण्यास मदत होईल.”

कार्यकर्त्यांनी “मोदी सरकारचा विजय असो” आणि “जय भीम” अशा घोषणा देत आनंद व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button