
गोंदिया : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम हे येत्या १५ मे रोजी गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यामध्ये ते जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांना भेटी देऊन विकासकामांचा आढावा घेणार आहेत.
ॲड. मेश्राम १५ मे रोजी सकाळी नागपूरहून कारने गोंदियाकडे प्रस्थान करतील आणि शासकीय विश्रामगृहात त्यांचे आगमन होईल. त्यानंतर सकाळी ११ वाजता ते गोंदिया नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतील आणि सुरू असलेल्या कामांची पाहणी व तपासणी करतील.
दुपारी १२ वाजता त्यांचा तिरोडा नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांसोबत आढावा आणि पाहणीचा कार्यक्रम आहे. त्यानंतर दुपारी १ वाजता ते आमगाव नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांसोबत विकासकामांचा आढावा घेतील व पाहणी करतील. दुपारी २ वाजता सडक अर्जुनी नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांसोबत आढावा व पाहणी केल्यानंतर दुपारी ३ वाजेपर्यंतचा वेळ राखीव ठेवण्यात आला आहे.
दुपारी ३ वाजता ॲड. मेश्राम अर्जुनी मोरगाव नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतील आणि कामांची पाहणी व तपासणी करतील. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता गोरेगाव आणि सायंकाळी ५ वाजता देवरी नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांसोबत ते आढावा घेणार आहेत व विकासकामांची पाहणी करणार आहेत. सायंकाळी ६ वाजता सालेकसा नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांसोबत आढावा व पाहणी केल्यानंतर ते शासकीय विश्रामगृह, गोंदिया येथे मुक्काम करतील. १६ मे रोजी सकाळी सोयीनुसार गोंदियातून कारने गडचिरोलीकडे प्रस्थान करतील.



