चंद्रपूरविदर्भ

महावितरण चंद्रपूर परिमंडळाच्या उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारीपदी विशाल पिपरे

चंद्रपूर : महावितरण चंद्रपूर परिमंडळाच्या उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारीपदी विशाल भास्करराव पिपरे यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. यापूर्वी त्यांनी महावितरणच्या जळगाव परिमंडळात दोन वर्षे आणि अकोला परिमंडळात सात वर्षे यशस्वीरित्या काम केले आहे.

महावितरणमध्ये रुजू होण्यापूर्वी पिपरे यांनी व्यवस्थापक (मा.स.) म्हणून अंबुजा सिमेंट आणि बल्लारपूर पेपर मिल येथे मानव संसाधन आणि औद्योगिक संबंध यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर कार्य केले आहे.

चंद्रपूर परिमंडळात रुजू होताच, परिमंडळाचे मुख्य अभियंता हरीश गजबे आणि चंद्रपूर मंडळाच्या अधीक्षक अभियंता संध्या चिवंडे यांनी विशाल पिपरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button