क्राईमचंद्रपूरविदर्भ

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधम आरोपीला अटक

आईने घरी बोलावल्याचे सांगून नेले घरी

भद्रावती : शहरातील एका नराधमाने एका १४ वर्षीय अल्पवयीन बालिकेला स्वतःच्या घरी बोलावून तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना शुक्रवार (दि. १३) रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडली.

सलीम मुलखा सय्यद (वय ३०) असे अत्याचार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास आरोपी सय्यद पीडितेच्या घरी गेला. “तुला आईने माझ्या घरी बोलावले आहे,” असे खोटे सांगून त्याने त्या बालिकेला आपल्या घरी नेले. घरात नेल्यानंतर आरोपीने दरवाजा आतून बंद करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेनंतर पीडित मुलीने घडलेला प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. मुलीच्या सांगण्यावरून तिच्या आईने तातडीने भद्रावती पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ तपास सुरू केला. रात्री ९ वाजताच्या सुमारास पोलिसांनी आरोपी सय्यदला त्याच्या घरून अटक केली.

आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ) नयोमी साटम या करत आहेत. या घटनेने शहरात संतापाची लाट उसळली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button