गडचिरोलीविदर्भ

तालुका क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

माजी आ. कृष्णा गजबे यांनी उपस्थिती दर्शवत केला योगाभ्यास

आरमोरी : आरमोरी तालुका क्रीडा संकुल समिती आणि पतंजली योग परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आज सकाळी ६ वाजता तालुका क्रीडा संकुलाच्या प्रांगणात “आंतरराष्ट्रीय योग दिनाचे” आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शेकडो नागरिकांसह आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णा गजबे यांनी उपस्थिती दर्शवत योगाभ्यास केला आणि उपस्थितांना योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

माजी आमदार कृष्णा गजबे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, योग ही भारतीय संस्कृतीची एक अनमोल देणगी आहे, जी मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. आपले शारीरिक स्वास्थ्य चांगले ठेवण्यासाठी योगाचे महत्त्व अनमोल आहे. ते पुढे म्हणाले की, देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनी योगाचे जागतिक महत्त्व ओळखून संपूर्ण जगाला योगासाठी एकत्र आणले, आणि आज संपूर्ण विश्व योग दिन साजरा करत आहे—ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.

या योग सत्रात योग अभ्यास प्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती, ज्यामुळे हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button