गडचिरोलीविदर्भ

श्री. शंकरराव बेझलवार महाविद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

अहेरी : येथील श्री. शंकरराव बेझलवार कला-वाणिज्य महाविद्यालयात २१ जून रोजी जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्राचार्य डॉ. विजय सोमकुंवर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना (NSS), राष्ट्रीय छात्र सेना (NCC), शारीरिक शिक्षण विभाग आणि नेहरू युवा केंद्र अहेरी यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

योग दिनाचे औचित्य साधून योग शिक्षक नारायण सिडाम यांनी योगासंबंधी मार्गदर्शन केले. त्यांनी नियमित योगा केल्याने निरोगी आणि आनंदी जीवन कसे जगता येईल, याबद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच, योगाच्या प्रात्यक्षिकांचे धडे देऊन योगाचे महत्त्व समजावून सांगितले.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रा. जी.डी. जंगमवार, प्रा. पी.व्ही. घोडेस्वार, प्रा. मंगला बनसोड, प्रा. डॉ. आर.डी. हजारे, प्रा. सी.एन. गौरकार, प्रा. एस.आर. लांडे, दत्तू जाकेवार, प्रतीक शिंपी, राकेश वाघाडे आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी NSS कार्यक्रम अधिकारी प्रा. सी.एन. गौरकार आणि प्रा. पी.व्ही. घोडेस्वार यांनी विशेष प्रयत्न केले. सर्वोदय शिक्षण मंडळ चंद्रपूरचे अध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार, सचिव प्रशांत पोटदुखे, कार्यकारी अध्यक्ष आमदार किशोर जोरगेवार आणि इतर पदाधिकाऱ्यांनी जागतिक योग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button