
पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार व महाराष्ट्र सुरक्षा महामंडळातील प्रशिक्षणार्थ्यांनी केली योगासने
गोंदिया : भारत राखीव बटालियन-२, राज्य राखीव पोलीस दल गट क्र. १५, बिरसी कॅम्प गोंदिया येथे आज (२१ जून २०२५) आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. समादेशक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि लायन्स क्लब गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने गट मुख्यालयातील कवायत मैदानावर सकाळी ६ वाजता हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गट आस्थापनेवरील पोलीस निरीक्षक पवनप्रसाद मिश्रा यांनी केले. या कार्यक्रमासाठी लायन्स क्लबचे अध्यक्ष पोमेंद्र कटरे, कोषाध्यक्ष किशोर पटले, सदस्य मुरलीधर माहोरे, दीपक कदम, सुरेश बहेकार, दिलीप चौरागडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच, योगशिक्षक राजेंद्र असाटी आणि योगशिक्षिका माधुरी परमार यांनाही आमंत्रित करण्यात आले होते.
योगशिक्षक राजेंद्र असाटी आणि योगशिक्षिका माधुरी परमार यांनी गट हजर असलेले ९ पोलीस अधिकारी, १०३ पोलीस अंमलदार आणि महाराष्ट्र सुरक्षा महामंडळातील एकूण १८८ प्रशिक्षणार्थी यांच्यासोबत योगासने करून आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला.
यावेळी समादेशक अमोल गायकवाड, समादेशक सहायक श्रीकृष्ण गं. हिरपुरकर, पोलीस निरीक्षक एच. बी. कोळवते, पवनप्रसाद मिश्रा आणि पोलीस उपनिरीक्षक प्रशांत नारखेडे, बाबाराव राठोड, डी. एस. जगधने, नरेंद्र परिहार हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनाची आणि तयारीची संपूर्ण जबाबदारी पोलीस निरीक्षक पवनप्रसाद मिश्रा यांच्या नियंत्रणाखाली गटाचे रक्षक जमादार असई रवींद्र बन्सोड, सपोहवा आशिष पाखमोडे, सपोहवा नागेश शेलोकर, सपोहवा विजय गौतम, सपोहवा प्रकाश तुरकर, सपोशि प्रशांत वैद्य, सपोशि जमीर शेख यांनी यशस्वीपणे पार पाडली.



