गडचिरोलीविदर्भ

गडचिरोलीत काँग्रेसचे घंटानाद आंदोलन : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कृषी अधीक्षक कार्यालयासमोर निदर्शने

पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत, दुबार पेरणीसाठी सहकार्य आणि खतांच्या ‘लिंकिंग‘ पद्धतीवर कारवाईची मागणी

गडचिरोली : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीने जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात कृषी अधीक्षक कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन केले. यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक यांना निवेदनही सादर करण्यात आले.

गडचिरोली जिल्हा हा प्रामुख्याने कृषिप्रधान भाग असून, मोठ्या संख्येने नागरिकांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. सध्या खरीप हंगाम अंतिम टप्प्यात असताना, गेल्या काही दिवसांतील मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीमुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शासनाने तातडीने मदतीस धावून यावे, पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी आणि दुबार पेरणीसाठी आवश्यक ते सर्व शासकीय पाठबळ द्यावे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी उत्तम दर्जाचे बी-बियाणे उपलब्ध करून द्यावे. जिल्ह्यात बोगस बी-बियाणे विक्री करणाऱ्या व्यापारी व कंपन्यांवर कठोर कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकण्यात यावे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असतानाही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुरेसे खत मिळत नाही. अनेक कृषी केंद्रांवर युरिया व डीएपी खतांचा तुटवडा आहे. तसेच, काही ठिकाणी खत विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांना ‘लिंकिंग’ पद्धतीने खते देण्यास भाग पाडले जात आहे, जिथे खत घेताना दुसऱ्या वस्तूंची खरेदी बंधनकारक केली जाते. ही पद्धत शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर अन्याय करणारी असून, ती त्वरित थांबवून शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खत उपलब्ध करून देण्यात यावे. यासह इतर मागण्यांना घेऊन जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात कृषी अधीक्षक कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले

या आंदोलनात माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, महिला अध्यक्ष ऍड. कविता मोहरकर, शहर अध्यक्ष सतीश विधाते, गडचिरोली तालुकाध्यक्ष वसंत राऊत, आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, धानोरा तालुकाध्यक्ष प्रशांत कोराम, चामोर्शी तालुकाध्यक्ष प्रमोद भगत, किसान सेल अध्यक्ष वामनराव सावसाकडे, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, युवक काँग्रेस अध्यक्ष नितेश राठोड, प्रभाकर वासेकर, माजी नगरसेवक रमेश चौधरी, माजी जि. प. सदस्य विनोद लेनगुरे, घनश्याम वाढई, प्रतीक बारसिंगे, पुष्पलता कुमरे, आशा मेश्राम, अपर्णा खेवले, सुनिता रायपुरे, शालिनी पेंदाम, कविता उराडे, मालता पुडो, पौर्णिमा भडके, उत्तम ठाकरे, सुभाष कोठारे, सुरेश भांडेकर, योगेंद्र झंजाळ, उमेश आखाडे, जितेंद्र मुनघाटे, मिलिंद बारसागडे, जावेद खान, माजिद सय्यद, निखिल खोब्रागडे, श्रीनिवास ताटपल्लीवार, स्वप्निल बेहरे, सुधीर बांबोळे, गोपाल कविराज, चोकाजी बांबोळे, नृपेश नांदणकर, रमेश धकाते, प्रफुल अंबोरकर, जितेंद्र मुप्पीडवार, तोमदेव जुवारे, सुभाष कोठारे, नीलकंठ गेडाम, गोपाल कोमलवार, जोगुजी तुंकलवार, नामदेव वासेकर, लहुजी भांडेकर, नामदेव फावणवाडे, रवींद्र मडावी, रोहिदास अलाम, तुळशीराम बोबाटे, जोगुजी भोयर, रमेश मुनरतीवार, देवराव मोहुर्ले, राजेंद्र कुकडकार, सुभाष धाईत, नामदेव अंडगलवार, जनार्धन तुंकलवार यांसह शेकडोच्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी आणि शेतकरी बांधव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button