गोंदियाविदर्भ

तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडून सातगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची तपासणी

स्वच्छता, सुविधा आणि कर्मचारी शिस्तीवर भर देण्याचे निर्देश

गोंदिया : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पत्रानुसार, जिल्हा व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी कार्यक्षेत्रातील आरोग्य संस्थांना भेटी देऊन तेथील स्वच्छता व सुरक्षा, औषध उपलब्धता, वैद्यकीय सुविधा, रुग्णांसमवेत सुसंवाद याबाबत निर्देशकांची पाहणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याअनुषंगाने २३ जून रोजी सालेकसाचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील आत्राम यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र सातगाव येथे आकस्मिक भेट देऊन कामकाजाची पाहणी केली.

भेटीदरम्यान डॉ. आत्राम यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र सातगाव येथील प्रसूतिगृह, प्रयोगशाळा, आंतररुग्ण वॉर्ड, औषधी साठा, लस साठवणूक केंद्र इत्यादींची पाहणी केली. लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्याच्या दृष्टिकोनातून सुधारणा करण्याच्या सूचना त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या.

प्राथमिक आरोग्य केंद्रातील आतील व बाहेरील परिसराची नियमित स्वच्छता राखणे. सर्व कर्मचाऱ्यांनी बायोमेट्रिक हजेरी नोंदवणे. बाह्यरुग्ण सेवा (ओपीडी) दरम्यान रुग्णांना वेळेत आणि चांगल्या सोयी उपलब्ध करून देणे. क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी नियमित गावनिहाय भेटीचे नियोजन करणे. पर्यवेक्षकांनी उपकेंद्रांना भेटी देऊन सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचा आढावा घेणे. हलचल रजिस्टरवर नोंदी करूनच मुख्यालय सोडणे. सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे करणे. कर्मचाऱ्यांनी कर्तव्यस्थानी ओळखपत्र व ड्रेस कोड नियमांचे काटेकोरपणे पालन करणे. जैविक घनकचरा व्यवस्थापन योग्य प्रकारे करणे. जनआरोग्य समितीच्या सभा नियमित घेणे. कुपोषित अंगणवाडीतील बालकांची तपासणी करून त्यांना श्रेणीनुसार वर्गीकरण करून आवश्यक तो आहार देणे. टेलिकन्सल्टेशन सेवेचे सामुदायिक आरोग्य अधिकारी (CHO) मार्फत योग्य नियोजन करणे. गरोदर मातेला प्रसूतिपूर्व व प्रसूतीपश्चात नियमित सेवा देणे. पत्ता सिझन स्थलांतरित लोकांची आरडीके किटने मलेरियाबाबत तपासणी करणे. अंगणवाडीतील बालकांची नियमित तपासणी करणे. ‘स्टॉप डायरिया’ अनुषंगाने गावपातळीवर हात धुण्याचे प्रात्यक्षिक अंगणवाडी व शाळेमध्ये देणे. आरोग्य संस्थेत ओआरटी (ORS) कॉर्नर स्थापित करणे. आरोग्य विषयक जनजागृती साहित्य लोकांना दिसेल अशा ठिकाणी प्रदर्शित करणे. या बाबींवर भर देण्यात आला.

भेटीदरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रेया नागमोती यांसह आरोग्य संस्थेतील संपूर्ण स्टाफ व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button