गडचिरोलीविदर्भ

शिक्षण हे विद्यार्थ्यांसाठी केवळ एक कर्तव्य नाही, तर त्यांचे भविष्य घडवणारे एक अत्यंत महत्वाचे साधन – माजी आ. दिपकदादा आत्राम

पेरमिली आश्रमशाळेत प्रवेशोत्सव साजरा ; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

अहेरी : “शिक्षण हे आपल्याला वाचन आणि लिहिण्याची क्षमता शिकवते. वाचन आणि लेखन ही शिक्षणाची पहिली पायरी आहे. शिक्षणामुळे लोक साक्षर होतात. गरिबी आणि बेरोजगारी दूर करण्यासाठी शिक्षण हे सर्वात महत्त्वाचे साधन आहे. एखाद्या देशात शिक्षणाची पातळी जितकी जास्त असेल, तितकी विकासाची शक्यता जास्त असते. याशिवाय या शिक्षणाचा माणसाला विविध प्रकारे फायदा होतो,” असे प्रतिपादन माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी केले.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरीच्या वतीने आयोजित शासकीय माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा, पेरमिली येथे झालेल्या प्रवेशोत्सव कार्यक्रमाला ते उपस्थित होते. यावेळी दिपकदादा आत्राम यांनी शासकीय आदिवासी आश्रमशाळेत नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ व शैक्षणिक साहित्य देऊन स्वागत केले.

यावेळी आश्रमशाळेत मागील २४-२५ सत्रात इयत्ता १०वी व इयत्ता १२वी मध्ये पहिले तीन क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांना माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते रोख पारितोषिक देऊन पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. शिक्षणामुळे व्यक्तीला चांगले आणि माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत होते, तसेच करिअरच्या संधी निर्माण होऊन जीवनमान सुधारते, असेही आत्राम यांनी आपल्या भाषणात अधोरेखित केले.

यावेळी मंचावर सुहास वसावे (स. प्रकल्प अधिकारी), पालक जोगा मिच्छा, भोये (अधीक्षक), पालक रमेश सडमेक, जुलेख शेख, संजय आक्केवार, माजी सरपंच विजय कुसनाके, यादावार, श्रीमती मुळावार यांच्यासह आश्रमशाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, गावातील नागरिक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मावलीकर यांनी केले, सूत्रसंचालन चिमुरकर यांनी, तर आभार मेडी यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button