चंद्रपूरमहाराष्ट्रमुंबईविदर्भ

शिवरायांचे किल्ले जागतिक वारसा यादीत ; मुनगंटीवारांच्या अंगरक्षकाची रायगडावर सायकलवारी!

आ. मुनगंटीवार यांच्या अंगरक्षकाकडून १७० किमी सायकल प्रवास करत शिवछत्रपतींना मानवंदना

मुंबई : राज्याचे माजी सांस्कृतिक कार्यमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या दूरदृष्टीचा जागतिक परिणाम नुकताच महाराष्ट्राने अनुभवला. छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूमधील एक अशा एकूण १२ किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट केले आहे. या ऐतिहासिक आणि अभिमानास्पद निर्णयानंतर महाराष्ट्रात उत्साहाचे वातावरण आहे. याच उत्साहात आणि शिवप्रेमातून आमदार मुनगंटीवार यांचे अंगरक्षक पोलीस हवालदार संतोष रघुनाथ चिबडे यांनी मुंबईहून थेट रायगडपर्यंत १७० किलोमीटरची सायकलवारी करत शिवछत्रपतींना आगळीवेगळी मानवंदना दिली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकोटांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा निर्णय महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या ऐतिहासिक निर्णयाचा प्रत्यक्ष सन्मान करण्यासाठी पोलीस हवालदार संतोष रघुनाथ चिबडे यांनी मुंबईहून रायगडपर्यंत सुमारे १७० किलोमीटरचे अंतर सायकलने केवळ एका दिवसात पार केले. ऐन पावसाळ्यात आणि कठीण हवामानातही शिवप्रेमाच्या प्रेरणेने त्यांनी ही अविस्मरणीय यात्रा पूर्ण केली, ज्याबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

आमदार मुनगंटीवार यांच्या अथक प्रयत्नांमुळे ‘मराठा लष्करी भूप्रदेश’ या संकल्पनेला युनेस्कोने मान्यता दिली. हा ऐतिहासिक क्षण साजरा करताना, त्यांच्या अंगरक्षकाने सायकल यात्रेसारख्या धाडसी कृतीने आपले शिवप्रेम व्यक्त केले.

आमदार सुधीर मुनगंटीवार यांनीही संतोष चिबडे यांच्या या धाडसाचे विशेष कौतुक केले आहे. “छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या वैभवाचा जागतिक स्तरावर झालेला गौरव आणि त्याला आपल्या अंगरक्षकाने सायकल यात्रेद्वारे दिलेली मानवंदना हा अभिमानाचा क्षण आहे,” असे मत आमदार मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.

युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आलेले किल्ले:

  • महाराष्ट्रातील: रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी.
  • तामिळनाडूमधील: जिंजी.

शिवरायांच्या स्वराज्य विचारांना जागतिक स्तरावर स्थान मिळवून देणाऱ्या या ऐतिहासिक घडामोडीत आमदार मुनगंटीवार यांचे योगदान वाखाणण्याजोगे असून, त्यांच्या नेतृत्वातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक गौरवात लक्षणीय भर पडल्याचे सर्वत्र म्हटले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button