गडचिरोलीमहाराष्ट्रमुंबईविदर्भ

सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र चपराळा येथील जमिनीला ‘क वर्ग’चा दर्जा द्या! – आ. डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांची मागणी

वनमंत्री व अधिकाऱ्यांसमवेत सकारात्मक चर्चा

मुंबई : गडचिरोली जिल्ह्यातील सुप्रसिद्ध चपराळा येथील हनुमान मंदिर प्रशांत धाम (देवस्थान) तीर्थक्षेत्राला ‘क’ वर्ग दर्जा देण्याची मागणी आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांनी शासनाकडे केली आहे. या संदर्भात राज्याचे वनमंत्री गणेश नाईक आणि वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत बुधवार, १६ जुलै रोजी सकारात्मक चर्चा झाली. यामुळे चपराळा तीर्थक्षेत्राच्या विकासाला गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

चपराळा येथे दरवर्षी महाशिवरात्रीला मोठी जत्रा भरते. तसेच महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि इतर राज्यांमधूनही मोठ्या संख्येने भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. मात्र, तीर्थक्षेत्राची जागा सध्या संस्थेच्या अखत्यारीत नसल्याने देखभाल, दुरुस्ती आणि इतर विकासात्मक कामांमध्ये अडथळे येत होते, ज्यामुळे विकासाची गती मंदावली होती. यावर उपाय म्हणून, तीर्थक्षेत्राची जागा ‘क’ वर्गात समाविष्ट करून विकासाचा मार्ग मोकळा करण्यासाठी आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. त्यानुसार, बुधवार रोजी राज्याचे वनमंत्री ना. गणेश नाईक यांच्या दालनात या विषयावर महत्त्वपूर्ण आणि सकारात्मक बैठक पार पडली.

या चर्चेमुळे लवकरच हा विषय मार्गी लागून चपराळा येथील देवस्थान आणि तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी विकासकामांना चालना मिळेल अशी अपेक्षा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button