गोंदियाविदर्भ

 पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात १२६ उमेदवारांची प्राथमिक निवड

१६ कंपन्यांची उपस्थिती; रोजगारासोबत करिअर मार्गदर्शनाचाही लाभ

गोंदिया : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र गोंदिया, शासकीय तंत्रनिकेतन गोंदिया आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने २२ जुलै रोजी शासकीय तंत्रनिकेतन, गोंदिया येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात एकूण २०७ उमेदवार उपस्थित होते, त्यापैकी १२६ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.

या रोजगार मेळाव्यासाठी जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील १६ नामवंत कंपन्या उपस्थित होत्या. संबंधित कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित उमेदवारांना रोजगाराच्या संधींबद्दल मार्गदर्शन केले. तसेच, शासकीय तंत्रनिकेतनचे प्राध्यापक पी.आर. रामटेके यांनी करिअरविषयक महत्त्वाचे मार्गदर्शन केले. मेळाव्यात उपस्थित उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आणि त्याच वेळी १२६ उमेदवारांची प्राथमिक निवडही करण्यात आली.

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे उद्घाटन शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य सी.डी. गोळघाटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त रा.ना. माटे, विविध कंपन्यांचे पदाधिकारी, तसेच जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र गोंदिया आणि शासकीय तंत्रनिकेतन गोंदिया या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मो. निसार अ. सलाम यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button