गडचिरोलीविदर्भ

गडचिरोलीत कारगिल विजय दिन साजरा ; शहिदांना आदरांजली

भर पावसातही नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग ; माजी खा. डॉ. अशोक नेते यांच्या उपस्थितीत वीर माता, पत्नी व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

गडचिरोली : “शूर वीर मरतात, पण त्यांच्या शौर्याची गाथा अमर राहते…” या भावनेने प्रेरित होऊन शनिवारी गडचिरोलीतील कारगिल चौकात कारगिल विजय दिन उत्साहात साजरा करण्यात आला. माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते यांच्या प्रमुख उपस्थितीत शहीद जवानांना आदरांजली अर्पण करण्यात आली.

डॉ. नेते यांनी कारगिल युद्धातील भारतीय सैन्याच्या पराक्रमाचे स्मरण करून, जवानांच्या बलिदानामुळेच आपण सुरक्षित असल्याचे सांगितले. “कारगिल विजय हा केवळ लष्करी विजय नसून, तो राष्ट्राभिमान, एकता आणि भारतीय शौर्याचा जयघोष आहे,” असे ते म्हणाले. हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला असतानाही, भारत मातेच्या प्रेमापोटी नागरिकांनी छत्र्या घेऊन मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. शालेय विद्यार्थी, एनसीसी कॅडेट्स, माजी सैनिक आणि सामान्य नागरिकांच्या एकत्रीकरणाने देशभक्तीचा प्रत्यय आला.

यावेळी वीर माता, वीर पत्नी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा डॉ. अशोक नेते आणि कर्नल विक्रम मेहता यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला गडचिरोली पोलीस ठाण्याचे ठाणेदार चव्हाण, नगर परिषदेचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदूरकर, वीर पत्नी सुधा चंदनखेडे, घिसुलाल काबरा, सामाजिक नेते चंद्रशेखर भडांगे, नंदु कुमरे, उदय धकाते, सुभेदार ऋषी वंजारी, वालोदे, हवालदार महादेव वासेकर, हवालदार ईश्वर राऊत, गिरडकर, देशमुख यांच्यासह नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता “महाराष्ट्र गीत” आणि “राष्ट्रगीत” गात झाली, ज्यामुळे संपूर्ण परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button