गोंदियाविदर्भ

‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत 17 सप्टेंबरला जनसुनावणी

गोंदिया : पिडीत महिलांना स्थानिक पातळीवर तात्काळ मदत व्हावी याकरीता महाराष्ट्र राज्य महिला आयोगामार्फत ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत 17 सप्टेंबर 2025 रोजी जनसुनावणी आयोजित करण्यात आली असून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर ह्या उपस्थित राहणार आहेत. 17 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, जिल्हा नियोजन भवन, गोंदिया येथे जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे. तसेच पोलीस विभागाकडील महिला व मुलांकरीता असलेल्या सहाय्य कक्षाकडे प्राप्त असलेली प्रकरणे तसेच जिल्ह्यातील पोलीस मुख्यालयात स्थापन करण्यात आलेल्या भरोसा सेलकडे प्राप्त प्रकरणे जनसुनावणीत ठेवण्यात येणार आहेत.

तक्रारदार पिडीत महिलांना स्थानिक पातळीवर तात्काळ मदत व्हावी, कोणतीही पिडीत महिला कोणतीही पुर्व सुचना न देता थेट सुनावणीस आपली समस्या लेखी स्वरुपात आयोगाकडे मांडू शकेल. सदर जनसुनावणीस जिल्हा विधी सेवा प्राधिकरण विधीतज्ञ, पोलीस विभाग, समुपदेशन केंद्र यांच्याकडून तात्काळ सेवा उपलब्ध करुन देण्यात येईल. यासाठी जिल्ह्यातील महिलांनी आपल्या समस्या आयोगाकडे मांडाव्यात, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रेश्मा मोरे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button