
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठात संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची 401 वी जयंती श्रद्धाभावाने साजरी करण्यात आली. या निमित्त विद्यापीठ परिसरात आयोजित माल्यार्पण कार्यक्रमास गोंडवाना विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मनोज जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमादरम्यान संताजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी उपकुलसचिव देवेंद्र झाडे, विद्यापीठ अभियंता जितेंद्र अंबागडे, सिस्टम अनालिस्ट अमोल खोडवे, प्रा. बांगडे, प्रा. गचके, अधीक्षक सुभाष देशमुख, निवड श्रेणी लिपिक योगेश चरडे, सतिश पडोळे, माधुरी परसे, उच्च श्रेणी लिपिक सूचिता मोरे, संतोष नैताम, वनश्री बोबाटे, योगिता कुंभारे, देविदास नागापुरे, प्रशांत खंडाळकर आदी उपस्थित होते.
संताजी जगनाडे महाराज यांच्या कार्याचा आदर्श ठेवून समाजात समता, सद्भावना आणि सेवा भाव जपण्याचा संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात आला. कार्यक्रमाचे सुयोग्य आयोजनाकरिता सहकार्या केल्याबद्दल महादेव वासेकर यांनी सर्वांचे आभार मानले.



